मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी १५ दिवसांची राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. मात्र असे असले तरी भारतीय पर्यटकांमध्ये मालदीवबद्दल असलेली क्रेझ जराही कमी झालेली नाही.थॉमस कुक इंडियाने दिलेल्या माहितीनुसार टूर डेस्टिनेशन म्हणून मालदीव हा एक आवडता भाग आहे. मात्र मालदीवमधील सध्याच्या परिस्थितीनंतर आम्हाला टूर्स रद्द करण्याबाबत किंवा स्थगितीसाठी कोणतीही विनंती करण्यात आलेली नाही. आम्ही आमच्या टूर्स ऑपरेशन्स टीम आणि स्थानिक भागीदारांच्या संपर्कात आहोत. मालदीव मधील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. मालदीव मध्ये नेहमीप्रमाणे व्यवसाय आणि व्यवहार सुरू आहेत. आम्ही आमच्या ग्राहकांच्या सुरक्षेची आणि सुरक्षिततेची योग्य ती खबरदारी घेत आहोत.तर, मालदीवमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली असली तरी बुकींगवर त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळालेला नाही.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews